बेरोजगारांनी शोधला रोजगाराचा मार्ग
बुलडाणा : कोरोनामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये मोठ्या शहरातून गावाकडे परत आलेल्या बेरोजगारांनी भाजीपाला विक्रीतून रोजगाराचा मार्ग शोधला आहे. बुलडाणा शहरात असे अनेक भाजीपाला विक्रेते समोर आले आहेत.
जुने झालेले पूल ठरताहेत धोकादायक
मेहकर : तालुक्यात अनेक पूल हे जुने झालेले आहेत. त्यात काही पूल हे ब्रिटिशकालीन असून, सध्या पावसाळ्याच्या दिवसात जुने झालेले हे पूल धोकादायक ठरत आहेत. त्यातील काही पुलांना तर १०० वर्षे होऊन गेलेली आहेत.
आरटीईतून प्रवेश नाकारणाऱ्या शाळांकडे लक्ष द्या
बुलडाणा : आरटीईअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश न देणाऱ्या शाळांकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी काही पालकांमधून होत आहे. परंतु मुलाचे भविष्य त्या शाळेच्या हातात राहात असल्याने शाळेसंदर्भात पालक तक्रार करण्यास समोर येत नाहीत.
पावसामुळे रस्त्यांची चाळण
मोताळा : ग्रामीण भागात पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातही घडत आहेत.