मेहकर : मेहकर मतदार संघाचे आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर यांच्या गाडीचा ९ जानेवारी राेजी रात्री १२ च्या दरम्यान जालना येथे अपघात झाला.यामध्ये रायमुलकर यांच्या मुलासह पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. आमदार संजय रायमुलकर यांचा मुलगा निरज संजय रायमुलकर व त्याचे मित्र ९ जानेवारीला औरंगाबाद गेले होते. तेथून परत येत असताना जालना शहरातील कन्हैयानगर ते बीड बायपास रस्त्यावर कार क्रमांक एमएच २८ बीके २७७७ चे अचानक टायर फुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या खाली उतरुन उलटली. या अपघातात निरज संजय रायमुलकर, वरद ठाकूर, ऋषी पागोरे,प्रतिक इंगळे व सुनील पंडारे किरकोळ जखमी झाले. निरज रायमुलकर हे स्वतः वाहन चालवत होते. सुदैवाने आ.संजय रायमुलकर मेहकर येथे होते. एक वर्षापूर्वी याच तारखेला मेहकर जानेफळ रस्त्यावर आ.संजय रायमुलकर यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यात आ.संजय रायमुलकर यांना दुखापत झाली होती.
आमदार संजय रायमुलकर यांच्या वाहनाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 16:46 IST
Sanjay Raimulkar : अपघातात निरज संजय रायमुलकर, वरद ठाकूर, ऋषी पागोरे,प्रतिक इंगळे व सुनील पंडारे किरकोळ जखमी झाले.
आमदार संजय रायमुलकर यांच्या वाहनाला अपघात
ठळक मुद्देनिरज संजय रायमुलकर व त्याचे मित्र ९ जानेवारीला औरंगाबाद गेले होते. बीड बायपास रस्त्यावर कार क्रमांक एमएच २८ बीके २७७७ चे अचानक टायर फुटले.त्यामुळे कार रस्त्याच्या खाली उतरुन उलटली.