मेहकर : तालुक्यातील शारा जवळ शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या वाहनाला २८ एप्रिल रोजी अपघात होवून वाहनाची काच फुटली आहे. या अपघातात आमदार रायमुलकर सुरक्षीत असून सुदैवाने कोणालही इजा झाली नाही. सध्या शेगाव ते पंढरपूर या महामार्गाचे काम सुरू असून त्यातील मेहकर ते अजिसपूर दरम्यानच्या महामार्गाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. कामाचा दर्जा निकृष्ट असून वळण रस्त्याचा कुठेही दिशादर्शक फलक लावलेला नाही. या महामार्गावर करोडो रुपये खर्च होत असताना कामाचा दर्जा मात्र निकृष्ट व संथगतीने सुरू असल्याने अधिकारी व कंत्राटदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप आ.संजय रायमुलकर यांनी केला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे खोदून ठेवले असून गिट्टीचे खडेही रस्त्यावर आहेत. आ.संजय रायमूलकर हे लोणारकडे जात असताना गिट्टीचा खडा उडून त्यांच्या वाहनाच्या समोरच्या काचावर आदळला व काच फुटली. सुदैवाने इतर कोणालाही काही लागले नाही. धिम्या गतीने सुरू असलेले हे काम लवकर सुरू व्हावे व कामाचा दर्जा उत्कृष्ट असावा याकरता आपण संबंधित विभागाशी बोलणार असल्याचे आ. संजय रायमुलकर यांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)
आमदार संजय रायमुलकर यांच्या वाहनाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 7:20 PM
मेहकर : तालुक्यातील शारा जवळ शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या वाहनाला २८ एप्रिल रोजी अपघात होवून वाहनाची काच फुटली आहे. या अपघातात आमदार रायमुलकर सुरक्षीत असून सुदैवाने कोणालही इजा झाली नाही.
ठळक मुद्देअपघातात आमदार रायमुलकर सुरक्षीत असून सुदैवाने कोणालही इजा झाली नाही. रायमूलकर हे लोणारकडे जात असताना गिट्टीचा खडा उडून त्यांच्या वाहनाच्या समोरच्या काचावर आदळला व काच फुटली. सुदैवाने इतर कोणालाही काही लागले नाही.