पीक कर्ज वाटपाची गती मंदावली
बुलडाणा : खरीप हंगाम सुरू हाेऊन दाेन महिने लाेटले तरी अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक कर्ज मिळाले नसल्याचे चित्र आहे. पीक कर्ज वाटपाची गती मंदावली आहे.
कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच
बुलडाणा : कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे रुग्णांनी सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी, डोकेदुखी असल्यास तात्काळ चाचणी करून घ्यावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
कृषिदूतांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
किनगाव राजा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, संलग्नित गीताई ट्रस्टअंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय आमखेडाचे कृषिदूत सौरभ संजय नाईक याने २१ जुलै रोजी निमगाव वायाळ येथे शेतकऱ्यांना फवारणी करताना घ्यावयाची काळजी तसेच शास्त्रशुद्ध फवारणी कशा पद्धतीने करावी, याबाबत मार्गदर्शन केले.
वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान
किनगाव राजा : पांगरी उगले येथील जयपूर तांडा शिवारात गत काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. कपाशी, साेयाबीन पिकांचे राेही नुकसान करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़
निर्जंतुकीकरणासाठी ग्रामपंचायतीचा आधार
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी पैसे कोठून आणायचे, असा प्रश्न या शाळांसमोर निर्माण झाला होता. उपाययोजनांचा खर्च ग्रामपंचायतींच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातून होत आहे.
नादुरुस्त वर्गखोल्यांकडे दुर्लक्ष
बीबी : परिसरतील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांची दुरवस्था निर्माण झाली आहे. वर्गखोल्यांची डागडुजी करण्यात येत नाही. सध्या शाळा बंद असल्याने याकडे प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही.
ज्ञानगंगा प्रकल्पात वाढला जलसाठा
बुलडाणा : बुलडाणा ते खामगाव रस्त्यावर असलेल्या निम्न ज्ञानगंगा प्रकल्पातील जलसाठा वाढला आहे. संततधार पावसाने जलस्रोतांना जलसंजीवनी मिळाली आहे. ज्ञानगंगा या प्रकल्पाचे विहंगम दृश्य येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
महिला बचत गट अडचणीत
मोताळा : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हजारो महिलांनी बचत गटाची स्थापना केली; परंतु आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने स्वयंराेजगार उभारण्यास अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.
फवारणी पंपांसाठी राॅकेल मिळेना
किनगाव राजा : ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सोयाबीन आणि कपाशी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणीला वेग दिला आहे. मात्र, फवारणी करणाऱ्या पंपांसाठी राॅकेल मिळत नसल्याचे चित्र सिंदखेड राजा तालुक्यात आहे.