शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

Accident: एसटीच्या बाहेर आलेल्या पत्र्यामुळे दोघांचे हात कापले, आणखी एक जण गंभीर, मलकापूर-पिंपळगाव देवी रस्त्यावरील घटना

By योगेश देऊळकार | Published: September 16, 2022 12:29 PM

Accident: धावत्या एसटी बसच्या बाहेर आलेल्या पत्र्याने रस्त्यावरून चालणाऱ्या दोघांचा हात दंडापासून वेगळा झाल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी घडली. मलकापूर-पिंपळगांव देवी रस्त्यावर घडलेल्या या अपघातात दोघांचे हात कटले आहेत तर तिसऱ्याच्या हातावर जबर खरचटले आहे

- योगेश देऊळकारमलकापूर : धावत्या एसटी बसच्या बाहेर आलेल्या पत्र्याने रस्त्यावरून चालणाऱ्या दोघांचा हात दंडापासून वेगळा झाल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी घडली. मलकापूर-पिंपळगांव देवी रस्त्यावर घडलेल्या या अपघातात दोघांचे हात कटले आहेत तर तिसऱ्याच्या हातावर जबर खरचटले आहे. दोघांवर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून एकास अत्यवस्थ अवस्थेत जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले आहे.

मलकापूर आगारातून एसटी क्रमां एम.एच.४०/एन.९१२१ ही आज, शुक्रवारी सकाळी ६ वाजता निघाली होती. सकाळी ६.२० वाटेच्या सुमारास धावत्या एसटीचा चालकाच्या पाठीमागील बाहेर आलेल्या पत्र्याने विरूद्ध दिशेने आलेल्या मोटारसायकल स्वार गणेश शंकर पवार (वय ३६ रा. पिंपरी गवळी) यांच्या हाताला जबर खरचटले व एसटी पुढे धावली. धावत्या एसटीच्या बाहेर निघालेल्या पत्र्याच्या कचाट्यात पुढे पोलिस भरतीसाठी धावत असलेला विकास गजानन पांडे (वय २२ रा. उर्रा) हा आला. बाहेर आलेल्या पत्र्याने त्याचा हात कलम केला तर त्याच्या डोक्यात गंभीर जखमा झाल्या. त्याची तब्येत खालावल्याने त्याला मलकापूर येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

याच घटनेत धावत्या एसटीच्या बाहेर आलेल्या पत्र्याने परमेश्वर आनंदा सुरडकर (वय ४५ रा.आव्हा) यांचा देखील हात कलम झाला. त्याचबरोबर पोटावर गंभीर जखमा झाल्या. त्यांचे आतडे बाहेर आल्याने त्यांना अत्यवस्थ अवस्थेत जळगाव खान्देशात हलविण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक द्वय सुखदेव भोरकडे व बालाजी सानप यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी एसटी स्थानकात दाखल होऊन परिस्थिती हाताळल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.संतप्त नागरिकांनी केली आगारप्रमुखांच्या कार्यालयात तोडफोडया घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आगारप्रमुख दादाराव दराडे यांना आगारात बोलावून घेतले. काही क्षणातच संतप्त गावकऱ्यांनी आगारप्रमुखांच्या कार्यालयात तोडफोड केली. आगारप्रमुखांवर हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. मात्र कसाबसा हात निसटून आगारप्रमुखांनी पळ काढल्याने ते बाल बाल बचावले आहेत. या घटनेनंतर चालक देवराव भावराव सुर्यवंशी यांनी एसटी धामणगाव पोलिस स्टेशनमध्ये जमा केली आहे. मलकापूर एसटीच्या स्थानकावर मात्र या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा