मोताळा: तालुक्यातील रोहिणखेड येथील २१ वर्षीय आंचल अंकुश नागरे या तरुणीचा सोमवारी आकस्मिक मृत्यू झाला.आंचल अंकुश नागरे ही सकाळी मोताळा येथे एका क्लाससाठी घरून आली होती. सदरचा क्लास संपल्यानंतर १० वाजता आंचल घरी जाण्याकरिता मोताळा बसस्थानक येथे गेली असता तिला अचानक भुरळ आली. त्यामुळे संबंधित नातेवाइकांनी तिला ग्रामीण रुग्णालय मोताळा येथे उपचारासाठी आणले असता, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी आंचल नागरे हिला मृतक घोषित केले. आंचल नागरेचे वडील अंकुश नागरे हे रोहिणखेड येथील नवजीवन हायस्कूल येथे शिपाई म्हणून कार्यरत असून, आंचल मोताळा येथील श्री शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकाऱ्यातर्फे कक्ष सेवक मधुकर विठ्ठल लहासे यांनी फिर्याद दिली आहे.
तरुणीचा आकस्मिक मृत्यू
By admin | Published: June 14, 2017 1:27 AM