शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

चार लाख ग्राहकांचे खाते ‘लिंक’ नाही

By admin | Published: November 14, 2014 11:23 PM

गॅस सिलिंडरसाठी थेट अनुदान योजना : बुलडाणा जिल्ह्यात जानेवारीपासून प्रारंभ.

सिद्धार्थ आराख / बुलडाणा केंद्र शासनाने मॉडिफाइड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर एलपीजी (एमडीबीटीएल) योजने अंतर्गत गॅस सिलिंडरधारकांना थेट अनुदान बँक खात्यात देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ४७२.५0 रुपयाला मिळणार्‍या सिलिंडरसाठी आता ९७१ रुपये मोजावे लागणार आहेत. ही योजना उद्या, १५ नोव्हेंबरपासून राज्या तील काही निवडक जिल्ह्यात सुरू होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात ही योजना जानेवारी २0१४ पासून लागू करण्यात येणार आहे. मॉडिफाइड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर एलपीजी योजने अंतर्गत गॅस अनुदान १00 टक्के बँक खात्यात जमा केल्या जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात गॅसधारक ग्राहकांची संख्या ४ लाख ६५ हजार ६0४ एवढी आहे. यामध्ये आधार कार्डधारक व बँकेचे खात्याशी लिंक झालेल्या ग्राहकांची संख्या जेमतेम ४८ हजार १४९ एवढीच आहे. म्हणजे सुमारे ४ लाख १७ हजार ४५५ ग्राहकांनी अद्याप बँक खाते उघडून गॅस एजन्शीला लिंक केलेले नाही. त्यामुळे अशा गॅसधारक ग्राहकांना आपल्या बँक खात्याची नोंद संबंधित गॅ्रस वितरकाकडे करणे आवश्यक आहे. थेट खात्यात गॅस सिलिंडरची सबसिडी जमा करण्याची योजना मागील केंद्र शासनाने सुरू केली होती. दरम्यान, या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रक्रिया पार पाडताना ग्राहकांना त्रास सहन करावा लागला; तसेच एवढी रक्कम एकदम भरणे सामान्यांना कठीण जात असल्याने भुदर्ंड सहन करावा लागत होता. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात ओरड झाल्याने देशभरात ही योजना बंद करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपनेच या योजनेला विरोध दर्शविला होता. आ ता सत्तेत आल्यानंतर केंद्रातील याच भाजप सरकारने हीच योजना पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता ग्राहकाला बँक खाते लिंक करावे लागणार आहे.