बुलडाणा : तालुक्यातील अंभोरा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संजय गायकवाड यास पोलिसांनी ९ आॅक्टोबर रोजी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.६ आॅक्टोबर रोजी बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गतचे ग्राम अंभोडा येथील पीडित १० वर्षीय बालिकेचे आई- वडील शेतात गेले असता आरोपी संजय अर्जुन गायकवाड याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान आरडाओरड केली असता बालिकेचे आजोबा व भाऊ धावून आले तर आरोपी संजय गायकवाड पळून गेला होता. मात्र लोकांनी त्याला चोप दिला होता. मारहाणीत जखमी झालेला आरोपी संजय गायकवाड यास पोलिसांनी सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. आरोपीविरुद्ध ७ आॅक्टोबर रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ आॅक्टोंबरला आरोपीला रुग्णालयातून सुटी मिळाल्याने पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालया समोर हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:39 PM