लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मराठवाड्यासह बुलडाणा जिल्ह्यात घरफोडीसह चोरीच्या गुन्हे करणाऱ्या एका २२ वर्षीय चोरट्यास बुलडाणा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याच्या विरोधात जालना, अैारंगाबाद, नांदेड आणि बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास २२ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अट्टल गुन्हेगार असलेल्या दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक याच्या अटकेमुळे बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या अनेक घरफोड्यांचा छडा लागण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.सुंदखेड येथील मेडिकल फोडून दीपकसिंगने ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी त्यांला जालन्यातून अटक केली आहे. २५ नोव्हेंबर रोजी शहरानजीकच्या सुंदरखेड येथील एक मेडिकल फोडण्यात आल्याचे उघड झाले होते. यात रोख सात हजार रुपये, लॅपटॉप व अन्य साहित्य असा ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी माळविहीर येथील स्वप्नील सोनोने यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपीस केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 11:42 IST