लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : येथील नवीन बसस्थानकावरून अमरावती कारागृहातील कैदी पोलिसांच्या हाताला झटका देऊन हातकडीसह फरार झाल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी रात्री ८.१५ वा.च्या दरम्यान घडली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.याप्रकरणी पोहेकॉ गोविंद वानखडे यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की अमरावती कारागृहात असलेला अनिसखॉ दिलावरखॉ (वय ३८) याला कलम २२४ या प्रकरणात मोताळा येथील वि. न्यायालयात तारखेवर आणले असता न्यायालयीन पुढील तारीख मिळाल्याने, पोलीस बंदोबस्तात आरोपी मोताळा येथून बसने नांदुरा बसस्थानकावर ८ वाजेदरम्यान आला. या दरम्यान बसची विचारपूस करीत असताना नापोकॉ पुरुषोत्तम मिसाळ यांच्या हाताला जोराने झटका देऊन अंधाराचा फायदा घेऊन हातकडी व बागदोरसह पळून गेला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जळगाव जामोद येथील आरोपीसुद्धा नांदुरा बसस्थानकावरून पोलिसांच्या हाताला झटका देऊन पसार झाल्याची घटना घडली होती.
पोलिसांच्या ताब्यातील आरोपी हातकडीसह फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 1:05 AM
नांदुरा : येथील नवीन बसस्थानकावरून अमरावती कारागृहातील कैदी पोलिसांच्या हाताला झटका देऊन हातकडीसह फरार झाल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी रात्री ८.१५ वा.च्या दरम्यान घडली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देनांदुरा बसस्थानकावरील घटना पोलीस प्रशासनात खळबळपोलिसांच्या हाताला झटका देऊन फरार