लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : अल्पवयीन भाचीवर अत्याचार करणाºया नराधम मामास येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजरीची शिक्षा सुनावली आहे.खामगाव तालुक्यातील १५ वर्षीय मुलीवर तिचा चुलत मामा याने ४ मे २०१७ च्या अगोदर तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. यातून तिला गर्भधारणा होवून तिने एका मुलीला जन्म दिला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांनी पिंपळगाव राजा पोस्टेला तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन स्टेशनला मामाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली होती. जन्माला आलेल्या बाळाचे व आरोपी याचे डिएनए टेस्ट करून तोच मुलीचा बाप असल्याचे अहवालातून समोर आले. सदर प्रकरणाचा पूर्ण तपास करून पोलिसांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणात न्यायालयात एकुण १३ साक्षीदार तपासण्यात आले. याप्रकरणी आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द झाल्याने ६ जानेवारीरोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश आर.डी. देशपांडे यांनी निकाल देत आरोपीला दहा वर्षाचा सश्रम कारावास आणि २ हजाराचा दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीकडून सरकारी वकील वसंत भटकर आणि अॅड.आपटे यांनी युक्तीवाद केला. (प्रतिनिधी)
भाचीवर अत्याचार करणाऱ्या मामास दहा वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 3:43 PM