शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

परिश्रमाची पराकाष्ठा केल्यास यश निश्‍चित!

By admin | Published: October 24, 2016 2:36 AM

हॅण्डबॉल स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांचे प्रतिपादन.

बुलडाणा, दि. २३- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा यांच्या विद्यमाने २२ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत सहकार विद्या मंदिर, बुलडाणा येथे राज्यस्तर शालेय हॅण्डबॉल क्रीडा स्पर्धा १४, १७, १९ वर्षाआतील मुले/मुलींसाठी आयोजन करण्यात आलेले आहे.चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिरच्या विस्तिर्ण मैदानात रविवार २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३0 वाजता येथे उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विभागीय आयुक्त, जे.पी. गुप्ता, जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉ. विजय झाडे, क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाच्या उपसंचालक, प्रतिभा देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा परिषद अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी, नेमाने, निवासी उ पजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, बुलडाणा अर्बन को.ऑप. क्रे. सोसायटीचे मुख्य कार्यकारी संचालक, डॉ. सुकेश झंवर, शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कारार्थी टी.ए. सोर, बुलडाणा जिल्हा हॅण्डबॉल संघटनेचे अध्यक्ष दीपक जाधव, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तिडके आदी मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.खेळाडूंनी निवड केलेल्या खेळाचा नियमित सराव करावा. परिश्रमाची पराकाष्ठा करून खेळात यश संपादन करावे असे प्रतिपादन अमरावती विभागीय आयुक्त, जे.पी. गुप्ता यांनी केले. तर जिल्हाधिकारी विजय झाडे यांनी उपस्थित हॅण्डबॉल खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, उन्हाचे चटके मिळाले तरच सावलीचा आनंद मिळेल. त्यामुळे त्याप्रमाणे खेळ खेळण्याचे सार्मथ ठेवण्यास निश्‍चितच खेळाचा आनंद घेता येईल. खेळ खेळण्याचे सार्मथ ठेवा.सर्वप्रथम मोमेन्टो व स्वामी विवेकानंद यांचा विचारग्रंथ देऊन सर्व प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. तद्नंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व मशालद्वारे ज्योत पेटविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाच्या उपसंचालक, प्रतिभा देशमुख यांनी केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, राज्यस्तर स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंचा सहभाग आहे. त्यांची निवास, भोजन, मैदान व्यवस्थेबाबत सविस्तर सांगितले व खेळाडूंना भरभरून शुभेच्छा दिल्या. मशाल प्रज्वलित करून व फटाक्यांच्या आतषबाजीत मान्यवरांच्या शुभहस्ते राज्यस्तर शालेय हॅण्डबॉल क्रीडा स्पधेर्चे उद्घाटन झाले असे जाहीर करण्यात आले.