लोकमत न्यूज नेटवर्कदुसरबीड : येथून जवळच असलेल्या जऊळका येथे गोठय़ामध्ये देशी दारूचे तीन बॉक्स मिळाले, तर ग्राम वाघजई येथे सहा देशी दारूचे बॉक्स, दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्याची घटना रविवारी घडली. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दारूचा वापर करणार्या जऊळका व वाघजई येथे किनगाव राजा पोलिसांनी मिळालेल्या माहि तीनुसार धडक कारवाई करून एकूण ८३ हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गजानन साहेबराव मुंढे यांचे शेत गट नं ११५ मधील बांधलेला गोठा असून, सदरचे शेत दत्तात्रय विश्वनाथ नागरे व शिवहरी ममताजी नागरे यांना बटाईने वहितीस दिलेले आहे. सदर बांधलेला गोठा व खोलीचा वापर ते करत असत. गावातील ग्रामपंचायत निवडणुकीकरिता सदरच्या गोठय़ामध्ये देशी दारू असल्याची गोपनीय माहिती व शेत मालकाची तक्रार ठाणेदार सेवानंद वानखडे यांना मिळाल्याने शे तातील गोठय़ामध्ये छापा मारला असता, तीन बॉक्स ज्यांची किंमत आठ हजार रुपये एवढी दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांविरुद्ध किनगाव राजा स्टेशनला गुन्हा नोंदविला आहे. तसेच ग्राम वाघजई येथे किनगाव राजा पोलिसांनी छापा टाकला असता, रामेश्वर शिवहरी सानप, उमेश गजानन सानप, सीताराम गोविंदा सानप, सचिन बाबूराव सानप यांना दोन मोटारसायकल क्रमांक एमएच २८ एन. ६0१२ व एमएच २८ ए.व्ही. ७८६४ देशी दारूची सहा बॉक्स असे एकूण ७५ हजार 0७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी ठाणेदार सेवानंद वानखडे, पोहेकॉ शेषराव सरकटे, जाकेर पठाण, महिला पो.हे.कॉ. जानकी केवट, योगेश राठोड, दत्तात्रय लोढे, विनायक मोरे, गणेश बांडे, मीना भिलावेकर यांनी कारवाई केली.
दारू बाळगणार्याविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 1:24 AM
दुसरबीड : येथून जवळच असलेल्या जऊळका येथे गोठय़ामध्ये देशी दारूचे तीन बॉक्स मिळाले, तर ग्राम वाघजई येथे सहा देशी दारूचे बॉक्स, दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्याची घटना रविवारी घडली.
ठळक मुद्देनिवडणुकीत दारूचा वापर जऊळका, वाघजई येथून ८३ हजारांचा माल जप्त