शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

क्षयरुग्णांची माहिती न देणाऱ्या दवाखान्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 12:18 PM

Khamgaon News माहिती देण्यास कुचराई करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांनी दिला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव  : क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी शासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. जे रुग्ण आजार लपवून खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतात. त्यावर योग्य उपचार व्हावेत, यासाठी आता खाजगी रुग्णालय, लॅब, मेडिकलचालकांना क्षय रुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  माहिती देण्यास कुचराई करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांनी दिला आहे. केंद्र शासनाच्या  आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने  प्रसिद्ध केलेल्या  अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद करून त्याला उपचार करणे व क्षयरोगाचा प्रसार रोखणे, बंधनकारक आहे.  नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून अशा रुग्णांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्थानी क्षयरोग निदान करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पॅथॉलॉजी, मायक्रो बायोलॉजी, प्रयोगशाळा, रिव्हर्स रेडिओलॉजी, सुविधा क्षयरुग्णांवर उपचार करणारे विविध पॅथॉलॉजी, रुग्णालये, डॉक्टर्स, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेत्यांना शासनाच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करावी लागणार आहे. 

शिक्षेसह दंडाचीही तरतूद

 जी संस्था नोंदणी करणार नाही, अशा संस्था, व्यक्तींना क्षयरोगाचा प्रसार करण्यास जबाबदार धरण्यात येणार आहे. दोषी ठरलेल्या व्यक्तीस सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद आहे.  त्यामुळे रुग्णालये, औषध विक्रेते, पॅथोलॉजिस्ट यांनी रुग्णांची माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हा क्षयरोग  अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावhospitalहॉस्पिटल