लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून संसर्गजन्य साखळी तोडण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. जीवनावश्यक वस्तूची सेवा सुरू आहे. मेहकर नगरपालिका सर्व भाजीपाला विक्रेते व फळविक्रेते यांना शुक्रवारी शिस्तीचे नियम लावून दिले असून भाजीपाल्याचे दुकाने सुरू ठेवण्यात आले आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी केले आहे.कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते ह्या सुविधा सुरू ठेवण्यात आलया आहेत. नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातील सर्व भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते यांचे दुकान १०० मीटर अंतरावर ठेवण्यात यावेत.या दुकानावर गर्दी होऊ नये म्हणून एका विशिष्ट अंतरावर चुन्याने मार्कींग करून त्याप्रमाणेच मालाची विक्री करण्याचे सक्त आदेश मेहकर नगरपालिका प्रशासनाने या दुकान, भाजीपाला विक्रेत्यांना दिले आहेत. मेहकरमध्ये चार ठिकाणी दोन भाजीपाला व दोन फळे विक्रीचे दुकाने लावण्यात आली आहेत. यामध्ये आठवडी बाजारातील राजीव गांधी काँम्लेक्स समोरील खुल्या जागेत, जानेफळ रोडवरील महीला महाविद्यालयाच्या बाजूला, बसस्थानक समोरील कार पार्किंग च्या क्षेत्रावरील जागेवर, दिवानी कोर्टाच्या समोरील मैदानावर प्रत्येक ठिकाणी दोन भाजीपाला व दोन फळ विक्रेत्यांच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. येथे आलेल्या ग्रहाकांनी दुकानासमोरील वर्तुळात एका विशिष्ट अंतरावरा उभे राहूनच खरेदी करावेत. या बाबीचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कारवाई करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. यावेळी नगराध्यक्ष कासम गवळी, उपाध्यक्ष जयचंद बाटीया, उपविभागीय पोलीस अधिकारी तडवी, मुख्याधिकारी सचिन गाडे, पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, आरोग्य निरीक्षक विशाल शिरपूरकर, जमदार बुध्दू गवळी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कोरोणाचा संसर्ग टाळण्यासाठी व जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी एकाच ठीकाणी गर्दी होवू नये म्हणून शहरातील मोकळ्या ठिकाणी मोजक्या दुकानदारांना दुकाने लावण्यासाठी परवानगी दिली आहे. याशिवाय शहरातील २१ वार्डामध्ये भाजीपाला व फळांच्या विक्रीकरीता दुकाने लावण्यात आलेली आहे.- सचिन गाडे,मुख्याधिकारी, न. प. मेहकर.