जिल्ह्यामध्ये एप्रिल २०२१ पूर्वीचा व त्यानंतर पुरवठा झालेला डीएपी, एमओपी, १०.२६.२६, १२.३२.१६., २०:२०:०:१३, १९:१९:१९, २४:२४:० तसेच सिंगल सुपर फॉस्फेट इत्यादी रासायनिक खते बाजारात उपलब्ध आहेत. जुन्या व नवीन दराचे रासायनिक खते बाजारात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी करताना खताच्या गोणीवरील किरकोळ कमाल विक्री किंमत (एमआरपी) पाहूनच खतांची खरेदी करावी तसेच रासायनिक खतविक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या ई-पॉस मशीनमध्ये जुन्या व नवीन रासायनिक खतांचे दर वेगवेगळे नोंदविलेल्या असल्याने शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना ही ई-पॉस मशीनची पावती विक्रेत्यांकडून घ्यावी व त्यावरून रासायनिक खतांच्या किमतीची पडताळणी करता येईल, केंद्रशासनाच्या एनबीएस (न्यूट्रीयंट बेस्ड सबसिडी) धोरणानुसार युरियावगळता इतर खतांचे दर निश्चित करण्याचा अधिकार खत उत्पादक कंपनीचे असल्याने बाजारामध्ये एकाच प्रकारचे खताचे वेगवेगळ्या कंपनीचे भाव वेगवेगळे असल्याने शेतकऱ्यांनी खरेदीवेळी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.
कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे आवाहन
काही विक्रेत्यांकडे जुन्या दराचे रासायनिक खत उपलब्ध असून देत नसल्यास किंवा जास्त पैशाची मागणी करत असल्यास व इतर रासायनिक खत, बियाणे व कीटकनाशकांबाबत तक्रारी असल्यास तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती व जिल्हा स्तरावर कृषिनिविष्ठा कक्षातील अरुण इंगळे जिल्हा गुणवंत नियंत्रण निरीक्षक व विजय खोंदील, मोहीम अधिकारी जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक व कृषी विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले आहे.