लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील जनुना चौफुल्लीवरील एका हॉटेलवर क्षुल्लक कारणावरून हाणामारी होऊन हॉटेलची तोडफोड झाल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गजानन सुरेश यादव (वय ३५) रा. रेखा प्लॉट याने शिवाजी नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, तो पानपट्टी बंद करून घराकडे जात असताना उपरोक्त ठिकाणी अजय वानखडेच्या हॉटेलवर थांबला. यावेळी जितु ठाकूर व आणखी दोघांनी काही कारण नसताना वाद घालून लोखंडी पाइपने मारहाण करून डोके फोडले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी जितु ठाकूरसह तिघांविरुद्ध कलम ३२४, ५0४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तर नर्मदाबाई वानखडे (वय ६0) रा. सतीफैल यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गजानन ऊर्फ कालु यादव याने रविवारी दुपारी त्यांच्या मुलाच्या हॉटेलवर येऊन चिवडा मागितला. यावेळी चिवडा देण्यास नकार दिल्याने त्याने चिडून जात हॉटेलवर साहित्याची तोडफोड करून ७00 रुपयांचे नुकसान केले. यावरून पोलिसांनी कालु यादवविरुद्ध कलम ४२७, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी अधिक तपास शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.
खामगाव : क्षुल्लक कारणावरून हाणामारी; हॉटेलची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 1:43 AM
खामगाव : येथील जनुना चौफुल्लीवरील एका हॉटेलवर क्षुल्लक कारणावरून हाणामारी होऊन हॉटेलची तोडफोड झाल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देजनुना चौफुल्लीवरील एका हॉटेलमधील घटनापरस्पर विरोधी तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल