- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्यातील प्रत्येक कुटुंबाला प्रती दिन दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा करण्यासाठीचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे. त्या आराखड्यामध्ये ठरवल्यानुसारच्या उपाययोजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचेही बंधन राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ४ सप्टेंबर रोजी घातले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे पाणईपुरवठा करण्याचे उद्दीष्ट ठरवण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस, स्वयंपाकासाठी, घरगुती वापरासाठी शुद्ध पुरेसा आणि शाश्वत पाणी पुरवठा केला जाईल. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जल जीवन मिशनची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी बेसलाईन सर्वेक्षण करून पुढील ४ वर्षांचे नियोजन केले जाईल. प्रथम गाव कृती आराखडा, जिल्हा कृती आराखडा व राज्याचा कृती आराखडा होईल.
स्टॅण्डपोस्टपासून घरात नळ
ज्या गावांमध्ये आधीच योजना आहेत, तसेच स्टॅण्डपोस्टपर्यंतच पाणी पोहचले तेथून नळाद्वारे घरात पाणी दिले जाणार आहे. ज्या गावांमध्ये योजना नाहीत, तेथे स्वतंत्र योजनांना मंजूरी मिळणार आहे. पाण्याचे प्रमाण कमी असलेल्या गावांचा समावेश प्रादेशिक योजनेमध्ये केला जाईल. स्वतंत्र योजनेसाठी १८ तर प्रादेशिक योजना ३६ महिन्यांत पूर्ण कराव्या लागणार आहेत.
पाणी व स्वच्छता मिशनची नव्याने रचनाजिल्हा परिषदेत असलेल्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची नव्याने रचना आहे. या मिशनचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर मुख्य कार्यकारी अधिकारी सहअध्यक्ष राहणार आहेत.
सरपंच, ग्रामसेवकाची राहणार समितीग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष म्हणून सरपंच तर सचिव म्हणून ग्रामसेवक यांच्याकडे जबाबदारी आहे. या समितीकडून नियोजन, अंमलबजावणी होईल.