खामगाव (बुलडाणा) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून विनापरवाना शे तमाल खरेदी करणार्या २0 व्यापार्यांवर बाजार समिती प्रशासनाने दंडात्मक कारवाई करून दंड वसूल केला आहे. जिल्हय़ातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समि तीकडे पाहिल्या जाते. येथे दररोज कोट्यवधीची उलाढाल होते. बाजार समितीत २00 पेक्षा जास्त खरेदीदार आहेत. तर १00 पेक्षा जास्त अडते आहेत. बाजार समितीमधून कुठलाही शेतमाल खरेदी-विक्री करण्यासाठी परवाना घेणे गरजेचे आहे. परंतु मागील काही दिवसांपासून बाजार समितीमध्ये विनापरवाना व्या पार्यांकडून खरेदी होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावरून कृउबास प्रशासनाने विनापरवाना शेतमाल खरेदी करणार्या २४ व्यापार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. त्यावर १0 नोव्हेंबर रोजी निर्णय देत बाजार समितीने २0 व्यापार्यांना बाजार फी व सुपरविजन फीच्या तिप्पट रक्कम दंड म्हणून भरण्याचे आदेश दिले. या खरेदीदारांमध्ये दीपक सानंदा, सुमिरन ट्रेडर्स, कपिल ट्रेडर्स, विद्यांश ट्रेडर्स, एस.एम. ट्रेडर्स, सद्गुरु ट्रेडर्स, गनराज ट्रेडर्स, बबलूसेठ सुरेका, मेहंदीपुरवाला ट्रेडर्स, एस.एम. चवरे, अनिल पंजवाणी, राम पंजवाणी, सुनील पंजवाणी, महेशआप्पा, अमित जोशी, नीलेश केडिया, मुक्ताई ट्रेडर्स, आर.एम. ट्रेडिंग कंपनी, ललित बद्रीनारायण राठी यांचा समावेश आहे.
विनापरवाना शेतमाल खरेदीप्रकरणी कारवाई
By admin | Published: November 16, 2014 12:00 AM