लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : नांदुरा : खामगाव शहरात ७ नोव्हेंबर रोजी आँल आऊट आँपरेशन दोन टप्प्यात राबवण्यात आले. सोबतच नांदुरा शहरातही हा उपक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये नाका बंदी करण्यात आली. खामगाव शहरात १५६ वाहनांच्या तपासणी दरम्यान ५० वाहनांवर कारवाई करण्यात आली. नांदुरा तालुक्यात दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. खामगाव शहर पाेलिस ठाण्याच्या वतीने राबवलेल्या या मोहिमेत ५ अधिकारी, ५० पुरूष कर्मचारी, १० महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी निगराणी बदमाश, सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. ठाण्याच्या हद्दीतील लाँजेस, हाँटेल, ढाबे, निर्जन स्थळी या ठिकाणी तपासणी केली. सोबतच शहरातील विकमसी चौक, डीपी रोड, शेगाव, जलंब नाका येथे नाकेबंदी करून १५६ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५० वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर एका वाहनचालकावर मद्य प्राशन केल्याची कारवाई झाली. पुढील काळातही ही कारवाई सुरूच राहिल, असे पाेलिस निरिक्षक सुनील अंबुलकर यांनी कळवले आहे. संपूर्ण जिल्ह्यातच अशा पद्धतीने नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली.
रस्ते नाकाबंदीमध्ये वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 4:18 PM