लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : मागील वर्षी शेतकऱ्यांनी विकलेल्या उडीद, मूग, हरभरा व तुरीचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वारंवार आंदोलने करून हा प्रश्न लावून धरला होता. मात्र त्याउपरही शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्यामुळे संतप्त स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक जानेवारीला चिखली जिनिंग प्रेसिंगचे कार्यालय पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे.नाफेडची सब एजंन्सी म्हणून चिखली जिनिंग प्रेसिंगची नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशन व विदर्भ मार्केटींग फेडरेशनच्या वतीने चिखली येथे शेतकºयांच्या उडीद, मूग, तूर, हरभरा खरेदी करण्यात आला होता. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात विकलेल्या उडीदाचे पैसे अजूनही शेतकºयांना मिळाले नाहीत. तर गत मार्च महिन्यात खरेदी केलेल्या तुरीचे व हरभºयाचे पैसे सुध्दा अद्याप शेतकºयांना मिळाले नाहीत. हा पैसा देण्यास चिखली जिनिंग प्रेसिंग एक वर्षापासून चालढकल करीत आहेत. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी प्रशासनाला निवेदने देवून तसेच आंदोलने करून सुध्दा प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. या उलट पैसे न देता तुमचा माल घेवून जा अशा धमक्या शेतकºयांना दिल्या जात होत्या. ज्या शेतकºयांनी आपला माल नेला त्यांना सुध्दा चांगला माल घेवून निकृष्ठ दर्जाचा माल दिल्या गेल्याचा आरोप आहे. त्यामुळे शेतकºयांचा आक्र ोश वाढला होता. याशिवाय तुरीची नोंदणी करून सुध्दा आॅनलाईन आॅफलाईनच्या घोळामध्ये माल घेतला नाही. शासनाने जाहीर केलेले अनुदान देखील शेतकºयांना देण्यात आलेले नाही. या सर्व प्रकाराला केवळ चिखली जिनिंग प्रेसिंग संस्था जबाबदार असताना वरिष्ठ अधिकाºयांकडून सुध्दा या संस्थेविरूध्द कोणतीही कारवाई होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी चिखली जिनिंग कार्यालयावर जावून कार्यालय पेटवून दिले. विशेष म्हणजे मंगळवारी सकाळ पासूनच शेतकºयांच्या प्रश्नावर जिल्हयात स्वाभिमानी आक्रमकपणे रस्त्यावर उतरली होती. त्यात, चिखलीत कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयच पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले होते. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस प्रशासनाची कारवाई सुरू होती. (तालुका प्रतिनिधी)
स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चिखली जिनिंग प्रेसिंगचे कार्यालय पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 2:00 PM