लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: रस्ता विस्तारीकरणासाठी गौण खनिज अवैध उत्खननासाठी कंत्राटदार कंपन्यांना महसूल प्रशासनाकडून झुकते माप दिले जात असल्याचे दिसून येते. ‘जान्दू’नंतर ‘मॉन्टे कार्लो’ कंपनीकडून खामगाव तालुक्यात अवैध उत्खनन करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी टेंभूर्णा येथील तलाठी आणि मंडळ अधिकाºयांचा संयुक्त चौकशी अहवाल दुर्लक्षीत असल्याची धक्कादायक बाब उघड होत आहे.राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण करणाºया ‘मॉन्टे कार्लो’ लिमिटेडकडून टेेंंभूर्णा शिवारातील गट नं ११४ आणि ११५ मध्ये उत्खनन करण्यात आले. उत्खनन करताना मोजणी आणि सीमांकन करून कामास सुरूवात करण्यात आलेली नाही. तसेच ३ मीटर खोलीपेक्षा खोदकाम केल्याची गंभीर नोंद तलाठी आणि मंडळ अधिकाºयांनी संयुक्त चौकशी अहवालात नमूद केली आहे. तसेच १५ ऑक्टोबर २० ते २७ नोव्हेंबर २० या कालावधीत २१५०० ब्रासचे भरणा केलेल्या चलनाच्या छायाप्रती प्रशासनाला सादर केल्या. मात्र, प्रत्यक्षात घटनास्थळी २१५०० ब्रासपेक्षाही जास्त गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तलाठी आणि मंडळ अधिकारी आवार यांनी केलेल्या संयुक्त चौकशी अहवालात ‘मॉन्टे कार्लो’ कंपनीने केलेल्या उत्खननाबाबत तांत्रिक तपासणी करण्याचे नमूद केले आहे. परंतू, गत सव्वा दोन महिन्यांपासून महसूल प्रशासनाकडून याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘कुठे तरी पाणी मुरत’ असल्याच्या शंकेला वाव मिळत आहे. यासंदर्भात महसूल विभागातील अधिकाºयांशी संपर्क केला असता, त्यांनी याप्रकरणी माहिती देण्याचे टाळले.
‘जान्दू’ नंतर ‘मॉन्टे कार्लो’वर प्रशासन मेहरबान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:27 PM