शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

प्रशासन निगरगट्ट ; मजुरांची जीवघेणी वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:14 AM

पोलिस,आरटीओ कडून कारवाई नाही सिंदखेडराजा : तालुक्यातील तढेगाव शिवारात टिप्पर उलटून तेरा निष्पाप मजुरांचा बळी गेला. या घटनेमुळे मजुरांच्या ...

पोलिस,आरटीओ कडून कारवाई नाही

सिंदखेडराजा : तालुक्यातील तढेगाव शिवारात टिप्पर उलटून तेरा निष्पाप मजुरांचा बळी गेला. या घटनेमुळे मजुरांच्या अवैध वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर असताना, दुसरीकडे मजुरांची अवैध वाहतूक सुरूच असल्याचे चित्र आहे. या चित्रात बदल दिसतो तो केवळ मजुरांचा जीव वाचावा म्हणून सेफ्टी जाकीट आणि कॅप दिल्या गेल्या आहेत.

‘त्या’ अपघाताची जखम अजून भळभळती आहे. पोट भरण्यासाठी हजारो किलोमीटरवरून मजूर महाराष्ट्रात येतात. समृध्दी महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे ते केवळ सरकार सांगते म्हणून नाही तर या मजुरांच्या मेहनतीवर ते अवलंबून आहे. आजही अवजड मशीनरी आल्या पण एक कोपरा मजुरांशिवाय पूर्ण होत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य असतानाही गरीब मजुरांच्या जीवाशी होणारा खेळ आजही राजरोस सुरूच आहे. याला ना पोलीस, ना महसूल प्रशासन ना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून अटकाव केला जातो.

तढेगाव शिवारात झालेल्या अपघातात मजूर लोखंडी रॉडखाली दबून मेले, त्यामुळे बांधकाम किंवा इतर अवजड साहित्य असलेल्या वाहनातून मजुरांची वाहतूक केली जाऊ शकत नाही किंवा मजुरांसाठी असलेल्या स्वतंत्र सीट व्यवस्था असलेल्या वाहनाने कोणत्याच साहित्य वाहतुकीला परवानगी नसते. हे नियम आहेत, परंतु याच नियमांचा अमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना विसर पडला का? भीषण घटना होऊनही यंत्रणांनी कोणतीच ‘समज’ घेतली नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सध्या सिंदखेडराजा परिसरात सुरू असलेल्या समृध्दी आणि अन्य बांधकाम कामावर मजुरांची अशीच जीवघेणी अवैध वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. फरक इतकाच की टिप्परची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. प्रशासन, संबंधित यंत्रणांनी कारवाई का करू नये, किंवा समृध्दी किंवा अन्य मोठ्या प्रकल्पावरील, ते खासगी असो किंवा सरकारी अशा कोणत्याच ठेकेदाराने मजुरांची अशी जीवघेणी वाहतूक करू नये यासाठी कारवाई करणे गरजेचे असताना, अद्याप कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. इतकेच नाही तर तेरा मजुरांचा बळी घेणाऱ्या यंत्रणेतील मूळ जबाबदारांना अजूनही साधे चौकशीसाठी बोलावले गेले नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. म्हणजे एवढा अपघात होऊनही केस फाईल बंद करण्यावरच अधिकचा जोर दिला जात आहे का, असा प्रश्न आहे.