शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

एकफळ गावात पोहोचली प्रशासकीय चमू

By admin | Published: September 05, 2014 12:32 AM

लोकमतच्या दणक्याने प्रशासन जागी; सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागाच्या संयुक्त चमूने एकफळ गावास भेट दिली.

फहीम देशमुख /शेगाव शेगाव तालुक्यातील एकफळ व कुरखेड गावाचे विदारक चित्र आज ह्यलोकमतह्ण ने प्रकाशित करताच प्रशासन खळबळून जागे झाले. आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकार्‍यांच्या संयुक्त चमूने एकफळ या गावास भेट देऊन चर्चा केली. नागरिकांच्या समस्या एकून अधिकार्‍यांनी पाहणी केली असता, या गावाला रस्ता करण्यासाठी प्रशासनाला वन विभाग, रेल्वे विभाग यांच्या परवानगीसह तब्बल चार पूल बांधावे लागणार असल्याचे समोर आले. २५0 लोकसंख्या असलेले एकफळ हे गाव शेगावपासून ५ कि . मी. अंतरावर असतानासुद्धा येथील नागरिकांना शेगावात पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अळसणा गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही. दीड कि. मी. अंतराच्या या रस्त्यासाठी आळसणा भागातील ४ शेतकर्‍यांनी दानपत्र देण्यासाठी नकार दिल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. ह्यलोकमतह्ण च्या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.के.परिहार, कनिष्ठ अभियंता जी.के. चोपडे, प्रदीप मसने यांच्यासह नायब तहसीलदार एस. झेड. पवार, मंडळ अधिकारी पद्मणे, तलाठी डाबेराव यांची चमू एकफळ गावात पोहोचली. अधिकारी गावात पोहोचल्याची माहिती मिळताच प्रत्येक घरा तील माणसे गावाच्या चौकात जमा होऊन अधिकार्‍यांना आपल्या समस्या सांगू लागले. या चमूने नागरिकांच्या समस्या ऐकून रस्त्याची पाहणी केली आणि समस्या जाणून घेतल्या. या गावाला मुख्य मार्गावर जोडण्यासाठी तब्बल चार पूल बांधावे लागणार असून, या पुलांसाठी किमान एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय वनविभागाचीही जमीन या रस्त्यामध्ये असल्याने त्यांची परवानगी मिळवावी लागणार आहे. शिवाय रेल्वेच्या हद्दीला लागुन पुलाचे काम करणार असल्याने त्यासाठीही रेल्वे विभागाची परवानगी लागणार आहे व हे सर्व मिळाल्यानंतरही याच मार्गात एक शेतकरी अल्पभूधारक असून, त्याच्या शेतातून रस्ता गेल्यास तो भूमिहीन होऊ शकतो. तर दुसरीकडे ज्यांच्याकडे शेती आहे ते दानपत्र द्यायला तयार नाहीत. या सर्व समस्यांवर आता शासनाला मार्ग काढावयाचा आहे. आज गावाला भेट देणार्‍या अधिकार्‍यांनी याबाबतचा संपूर्ण अहवाल आपण वरिष्ठांना सादर करणार असल्याचे गावकर्‍यांना सांगितले.शिवाय विधानसभा निवडणुकीवरील बहिष्कारही मागे घेण्याची विनंती या अधिकारी वर्गाने गावातील नागरिकांना केली. यावेळी पोलिस पाटील दिनकरराव देशमुख, अशोक कराळे, सुधाकर देशमुख, आनंदा देशमुख, पंजाब वानखडे, शिवरतन परदेशी, रवींद्र वानखडे, नागोराव देशमुख, महेश देशमुख यांच्यासह गावकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ** रस्त्यासाठी दोन कोटीएकफळ हे गाव तालुक्याला जोडण्यासाठी दोन कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी प्राप्त झाल्यास या मार्गावर चार छोटे पूल आणि भूसं पादनाची कामे होऊ शकतात. प्रशासन असा प्रस्ताव तयार करीत आहे.** एकफळसाठी ४0 लक्षएकफळ ते आळसणा या रस्त्यासाठी यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करून अंदाजपत्रक सादर केले होते. त्यामध्ये ४0 लक्ष रुपयेसुद्धा उपलब्ध झालेले आहे; मात्र निधी उपलब्ध असला तरी इतर समस्या सुटताना दिसत नाहीत.