लाेणार तालुक्यात रविवारी जिल्ह्यात सर्वाधिक पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. यामध्ये चाेरपांग्रा येथील ३६ जणांचा समावेश आहे. त्यामुळे, आराेग्य विभागाने २८ जूनला गावात भेट देऊन अनेकांच्या चाचण्या केल्या. गावातील सर्वांचीच काेराेना चाचणी करण्याची गरज आहे. तसेच कंटेन्मेंट झाेन तयार करून पाॅझिटिव्ह रुग्णांना क्वारंटाईन करण्याची गरज आहे़. गावातील ४६ जणांचा अहवाल अद्यापही आला नसल्याने पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ. कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. किसन राठोड, डाॅ. जैन, डाॅ. यूम, डाॅ. हरिष काळे, दीक्षा अवसरमाेर, नायब तहसीलदार पाटील, तलाठी पवार, ग्रामसेवक साैदर, सरपंच संजय चव्हाण, अंगणवाडी सेविका, तंटामुक्ती अध्यक्ष केशव डहाळके, पोलीस पाटील सुनीता आगलावे, ग्रामपंचायत शिपाई गजानन खंड, संजय इंगळे आदी उपस्थित हाेते.
चाेरपांग्रा येथे आराेग्य पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:24 AM