हिवरा आश्रम
: मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळीच्या सरपंचपदी किशाेर गाभणे यांची तर उपसरपंचपदी रंगनाथ चाळगे यांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कायर्यालयात मंगळवारी सरपंचपदासाठी ही निवडणुक घेण्यात आली.
यावेळी विस्तार अधिकारी पादरे , राम नवघरे, ग्रामसेवक मस्के , तलाठी पऱ्हाड या शासकीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात विशेष सभेला प्रारंभ झाला. यावेळी १३ सदस्यांपैकी महा विकास आघाडी परिवर्तन पॅनलचे चे सर्वच्या सर्व १० नवनियुक्त सदस्यांमधून सरपंच व उपसरपंच बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे देऊळगाव माळीचे सरपंचपद किशोर विश्वनाथ गाभणे तर उपसरपंच रंगनाथ हरिभाऊ चाळगे हे सांभाळणार आहे.
सरपंच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाने माखलेले ढोल, ताशा वाजवून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी प्रशासन व सुव्यवस्था राखण्याचे काम मेहकर पोलीस स्टेशनचे बीट जामदार मस्के , रामेश्वर रिंढे, पोलीस पाटील गजानन चाळगे यांनी पार पाडले.