लोकमत न्यूज नेटवर्कगोदरी : येथे दहा वर्षानंतर बससेवा सुरळीत सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकंना दिलासा मिळाला आहे. स्थानिक गोदरी येथे गेल्या काही वर्षापासून बससेवा खंडीत झाली होती. परंतु ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या प्रयत्नातून शुक्रवार पासून बस सुरू करण्यात आली. गावातील शाळकरी मुले-मुली यांना सुद्धा पासेसच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये शाळेत जाता येते आणि बससेवा सुरू झाल्यामुळे गावातील ज्येष्ठ नागरिक, अपंग यांनासुद्धा कमी दरात सवलत बसमध्ये असते. गावकºयांनी बसने प्रवास करावा असे आवाहन सरपंच लक्ष्मीबाई शेळके, उपसरपंच अभिमन्य कºहाडे, ग्रा.पं.सदस्य अमोल परिहार, तं.मु.अध्यक्ष शिवसिंग सुरडकर, गोदरी गावाचे संतोष जोगदंड, एस.टी.डेपो मॅनेजर पांडुरंग तांबोळे, सपकाळ, अशोक सुरडकर, रंगनाथ परिहार, पांडुसेठ भवर, राजु मुळे, एसटी कंडक्टर बद्री महाले, पो.पाटील राहुल ताळवे, महादू भालेराव, सुनिल थोटे, विठ्ठल परिहार, भागवत कुटे, स्वप्नील कुटे, शंकर तांबोळे, गणेश देशमुख, मोहन परिहार, विनोद भवर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गोदरी येथे अखेर दहा वर्षानंतर बससेवा सुरळीत चालू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 7:15 PM
गोदरी येथे दहा वर्षानंतर बससेवा सुरळीत सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकंना दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्देवर्षापासून खंडीत होती बससेवा विद्यार्थ्यांसह नागरिकंना दिलासा