लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पावसाअभावी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लागणारे खत, बियाणे खरेदी करण्याकडे पाठ फिरवली होती; मात्र शनिवारी रात्री झालेल्या पावसानंतर रविवारी खत, बियाणे खरेदीला वेग आल्याचे दिसून आले. जिल्ह्यात १८.९२ टक्के म्हणजे ३४८.३ मि.मी. पाऊस झाला आहे; मात्र पेरणीसाठी अद्यापही दमदार पावसाची आवश्यकता आहे.जिल्ह्यात खरीप हंगामाचे ७ लाख ३८ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे. यंदा मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी खरीप पेरणी पूर्व मशागतीची कामे केली होती; परंतु बहुतांश शेतकºयांनी पावसाच्या प्रतीक्षेत पूर्व मशागतीच्या कामांनाही हात घातला नाही. संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकºयांनी खत, बियाण्यांची खरेदीसुद्धा केली नाही. आतापर्यंत बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसून येत होता. पाऊस येत नसल्याने कृषी केंद्रावरही दुष्काळाचे सावट दिसून आले. पाऊस लांबल्याने खत, बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकरी बाजाराकडे फिरकत नव्हते. पावसाअभावी लाखो हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या होत्या. दरम्यान, शनिवारला सायंकाळी व रात्री जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात ३४८.३ मि. मी. पाऊस झाला आहे. प्रतीक्षेनंतर आलेल्या या पावसाने शेतकºयांनी खत, बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत जवळपास १० ते १५ टक्केच खत, बियाण्यांची विक्री झाली होती; मात्र या पावसानंतर कृषी निविष्ठांच्या खरेदीला वेग आला आहे.कपाशी लागवडीला वेग४पूर्वी धूळ पेरणीचा मोठा ट्रेंड जिल्ह्यात होता; मात्र आता मान्सून बेभरवशाचा झाला असल्याने बोटावर मोजण्याइतक्याच ठिकाणी धूळ पेरणी केली जाते. शनिवारी रात्री झालेल्या पावसानंतर जिल्ह्यात काही भागात कपाशीची लागवड करण्याला शेतकºयांनी सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सिंदखेड राजा तालुक्यात ५०.२ मि.मी. पाऊस झाला असून, बहुतांश ठिकाणी कपाशीची लागवड सुरू झाली आहे.
जिल्ह्यात ३४८.३ मि.मी. पाऊसजिल्ह्यात एकूण ३४८.३ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात ३५.१ मि.मी., चिखली ४२.३ मि.मी., देऊळगाव राजा २०.२ मि.मी., सिंदखेड राजा ५०.२ मि.मी., लोणार ३३.५ मि.मी., मेहकर ४०.९ मि.मी., खामगाव २३.६ मि.मी., शेगाव २९.८ मि.मी., मलकापूर ३.४ मि.मी., नांदुरा १२.४ मि.मी., मोताळा ७.५ मि.मी., संग्रामपूर १९.२ मि.मी. व जळगाव जामोद ३०.२ मि.मी. पाऊस आतापर्यंत झाला आहे.