बुलडाणा : दुध दरवाढीसंदभार्तील आंदोलनाचे यश पाहता येत्या काळत विदर्भ, मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संघटीत करून जिल्हानिहाय परिषदा घेण्यात येणार असल्याची माहिती स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी रविवारी येथे दिली. स्थानिक विश्रामगृहामध्ये रविवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कापूस, आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा लढा येत्या काळात लढणार असल्याचे संकेतच दिले. यावेळी स्वाभीमानीचे राणा चंद्रशेखर चंदन, शेख रफीक, प्रदीप शेळके, खंडूबा मोरे, नितीन जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात दुध उत्पादकांचा प्रश्न गंभीर बनत होता. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत असतानाच दुध उत्पादक शेतकरीही आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर आला होता. त्या पृष्ठभूमीवर केंद्र, राज्य सरकारमधील मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. पुण्यात मोर्चा काढण्यात आला पण राज्य शासनाने ही बाब गंभीरतेने न घेतल्यामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटनेला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागली. त्या उपरही पोलिस बळाचा वापर व कार्यकर्र्त्यांची धरपकड यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे तुपकर पुढे बोलतांना मिळाले. दुधाचा भाव आता शेतकऱ्यांना बांधून मिळणार असून भाव न देणाऱ्या दुध संघाला सबसीडी दिली जाऊ नये अशी आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले. सात ते नऊ रुपयांचा शेतकºयांना आता फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांशी दुध दरवाढीबाबत चर्चा होऊन भाव वाढीचा निर्णय झाल्यानंतर आंदोलनाला यश मिळाले. राज्यात एक कोटी ४० लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. मात्र गरज पाहता राज्यात २२ लाख लिटर दुध अतिरिक्त असल्याने दुधाच्या भावाचा प्रश्न निर्माण झाला होता, असे ते म्हणाले.दीडपट हमी भावात सरकारची चलाखीदीडपट हमी भावाबाबत केंद्र सरकारने हात चलाखी केली आहे. सोयाबीनला ३३०० रुपये हमी भाव दिला असला तरी उत्पादन खचार्तील अनेक बाबींना त्यांनी फाटा दिला आहे. त्यामुळे दीडपट हमी भावात तफावत येत आहे. स्वामीनाथ आयोगाच्या सी-२ फॉर्म्युल्यानुसार दीडपट हमीभाव देण्याची आमची मागणी आहे. त्याला फाटा देण्यात आला आहे. सोबतच दीडपट हमी भावासंदर्भात कायद्यात रुपांतर होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
दुध आंदोलनानंतर आता कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे संघटन - रविकांत तूपकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 5:51 PM
बुलडाणा : दुध दरवाढीसंदभार्तील आंदोलनाचे यश पाहता येत्या काळत विदर्भ, मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संघटीत करून जिल्हानिहाय परिषदा घेण्यात येणार असल्याची माहिती स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी रविवारी येथे दिली.
ठळक मुद्दे पत्रकार परिषदेत त्यांनी कापूस, आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा लढा येत्या काळात लढणार असल्याचे संकेतच दिले. शेतकऱ्यांना बांधून मिळणार असून भाव न देणाऱ्या दुध संघाला सबसीडी दिली जाऊ नये अशी आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले.