कऱ्हाळवाडी शिवारातील शेत सर्वे नं.३६६/१ येथे वसीम अहमद खान हसन शेर खान यांची शेतजमीन आहे. त्यांनी २०१८ मध्ये शेतमोजणीसाठी अर्ज केला होता. या मोजणीसाठी मोरे हे आले होते. त्यांनी टेबल पद्धतीने मोजणी केली होती. ही मोजणी झाल्यानंतर दीड वर्ष अहवालासाठी त्यांनी भूमीअभिलेख कार्यालयाच्या चकरा मारल्या. परंतु अद्यापही त्यांना अहवाल मिळालेला नाही. त्यामुळे अहवाल लवकरात लवकर देण्यात यावा, यासाठी त्यांनी उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालय मेहकर येथे वारंवार निवेदनही दिले आहे.
डोणगाव येथील भूमीलेख कार्यालय नावालाच
डोणगाव येथे भूमी अभिलेखचे कार्यालय असूनही तेथे कर्मचारी हजर राहत नसल्याने शेतकरी व इतरांना कोणत्याही कामासाठी मेहकर येथे जावे लागते. तेथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता केवळ बुधवारला भूमिलेखचा कर्मचारी डोणगांव कार्यालयात असतो, असे सांगण्यात येते; परंतु एक वर्षापासून एकाही बुधवारला हा कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने हे कार्यालय केवळ नावालाच उरले का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.