बुलडाणा : जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून आगामी खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे. एप्रिल २०२१ पासून युरिया वगळता इतर रासायनिक खतांची दरवाढ खत उत्पादक कंपन्यांनी केली होती. केंद्र शासनाने २० मे २०२१ च्या निर्देशानुसार या कंपन्यांना वाढीव किमतीसाठी अनुदान देण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे खत विक्रेता दुकानदारांनी खते जुन्याच दराने विक्री करावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे़ तसेच जादा दराने खत विक्री केल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे़
ज्या खत विक्रेत्यांकडे वाढीव दरातील खतांचा साठा उपलब्ध आहे त्यांनी सुधारित दराप्रमाणेच खते विक्री करावी. शेतकऱ्यांनी सुद्धा सुधारित दरांप्रमाणेच खते खरेदी करावी. सुधारित दरांपेक्षा वाढीव दराने खतांची विक्री होत असल्यास किंवा तसे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किंवा जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा कक्षातील अरूण इंगळे आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक व मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद बुलडाणा येथील विजय खोंदील यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन खते परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.
असे आहेत सुधारित विक्री दर (प्रति बॅग ५० किलो)
खताचा प्रकार ग्रेड : डिएपी – इफ्फको १२०० रु., जीएसएफसी १२०० रु., जय किसान १२०० रु., कोरोमंडल १२०० रु., महाधन १२०० रु., कृभको १२०० रु., १०:२६:२६ - इफ्फको ११७५ रु., जीएसएफसी ११७५ रु., जय किसान १३७५ रु., कोरोमंडल १३०० रु., महाधन १३९० रु., कृभको १३०० रु., १२:३२:१६ - इफ्फको ११८५ रु., जीएसएफसी ११८५ रु., जय किसान १३१० रु., महाधन १३७० रु., कृभको १३१० रु., २०:२०:०:१३ - इफ्फको ९७५ रु., जय किसान १०९० रु., कोरोमंडल १०५० रु., आरसीएफ ९७५ रु., महाधन ११५० रु., कृभको १०५० रु., १९:१९:१९ - जय किसान १५७५ रु. २८:२८:०० - जय किसान १४७५ रु., कोरोमंडल १४५० रु., १४:३५:१४ - जय किसान १३६५ रु., कोरोमंडल १४०० रु., २४:२४:०:८५ - कोरोमंडल १५०० रु., महाधन १४५० रू, १५:१५:१५:०९ - कोरोमंडल ११५० रु., १६:२०:०:१३ – कोरोमंडल १००० रु., १५:१५:१५ – आरसीएफ १०६० रु., १४:२८:०० – महाधन १२८० रु. , १६:१६:१६ – महाधन ११२५ रु., एमओपी - कृभको ८५० रुपये.