कृषी दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी रोहिदास मासाळकर यांनी पीक लागवडीसंदर्भात मार्गदर्शन केले. एक गाव एक वाण या संदर्भात एका वाणाची निवड एखाद्या गावाच्या शेतकऱ्यांनी केल्यास त्याच वाणाची संपूर्ण गावातील शेतकऱ्यांनी पेरणी करावी, यासंदर्भात शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याविषयी माहिती दिली. मागील वर्षी रब्बी हंगामात तालुक्यात पी. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हरभरा वाणाची निवड करून तालुक्यातील १३ शेतकऱ्यांनी त्यामध्ये भाग घेतला होता. यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात आले. विकास संपत चेके सरंबा यांचा प्रथम, पंजाबराव कोंडीबा चित्ते निमगाव गुरु द्वितीय आणि सुनील साहेबराव देशमुख यांचा तृतीय क्रमांक आला. यावेळी या शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत प्रमाणपत्र तसेच शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख अतिथी घनश्याम शिपणे यांनीसुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समिती सभापती रेणुका बुरकुल, रजनी चित्ते, भगवान खंदारे, एल. पी. सुरडकर, बी. आर. लवंगे, एस. आर. दाभाडे, के. डी. चिंचोले आदींसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
देऊळगाव राजा येथे कृषी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:24 AM