कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मनीषा पवार, जि. प. उपाध्यक्ष कमलताई जालिंधर बुधवत, जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर, समाज कल्याण सभापती पूनम राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे, कृषी विषय समिती सदस्य महेंद्र गवई, जिल्हा परिषदेचे सदस्य गोदावरीताई भगवान कोकाटे व विविध विभागाचे खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये शेतीच्या विकासामध्ये नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा व शेतीला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, या करिता जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्यावतीने वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमीत्त कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते २०२० च्या रब्बी हंगाम पीक स्पर्धेत विजेते प्रगतिशील शेतकरी भगवान कोकाटे, कोकाटे, भगवान बाजड, घाटे, आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन सी. एन. पाटील व विजय खोंदील यांनी सूत्रसंचालन केले.
जिल्हा परिषदेमध्ये कृषी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:23 AM