लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/खामगाव : गुलाबी-सेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील हजारो कापूस उत्पादक शेतकर्यांच्या संभाव्य नुकसानाची शक्यता लक्षात घेता, सर्वेक्षण तसेच प्रत्यक्ष भेटीच्या आधारे बाधित क्षेत्राची माहिती कृषी विभागाकडून गोळा केली जात आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार २५0 शेतकर्यांनी यासंदर्भात अर्ज केले आहेत. जिल्ह्यात दररोज सरासरी तीन हजार अर्ज याप्रकरणी कृषी विभागास प्राप्त होत असल्याची माहि ती सूत्रांनी दिली.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात कापसाचे सरासरी क्षेत्र हे दोन लाख ४४ हजार ४३0 हेक्टर आहे. यापैकी प्रत्यक्षात जिल्ह्यात यावर्षी एक लाख ७५ हजार पाच हेक्टरवर कापसाची लागवड झालेली आहे. यापैकी जवळपास सव्वा लाख हेक्टरवर कपाशी शेंदरी अळीमुळे धोक्यात आली आहे.सध्या जिल्ह्यात कृषीसेवक प्रत्यक्ष शेतकर्यांना भेटून त्यांच्याकडून याबाबतचे अर्ज भरून घेत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात घाटावर काही मोजक्या तालुक्यात आणि घाटाखाली मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर कपाशीचा पेरा झाला आहे. या सर्व भागात या बोंडअळीची समस्या निर्माण झाली आहे. कृषी विभागानेही यासंदर्भात आवाहन करून शेतकर्यांनी नमुना जीमध्ये माहिती भरून अर्ज देण्याचे आवाहन केले होते. त्यानुषंगाने खामगाव उपविभागातील शेकडो शे तकर्यांनी गुरुवारी कृषी कार्यालयात गर्दी केली होती.खामगाव उपविभागांतर्गत खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या पाच तालुक्यातील ५६0 गावांमधील हजारो शेतकर्यांनी ८३ हजार ८४१ हेक्टरवर कपाशीचा पेरा केला होता. दरम्यान, ऐन बहरात असतानाच ऑगस्ट महिन्यात गुलाबी-सेंदरी बोंडअळीने कपाशी पिकावर हल्ला चढविला. बोंडअळीच्या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील एकूण एक लाख ७५ हजार क्षेत्रापैकी सुमारे १ लाख ३५ हजार हेक्टरवरील कपाशी धोक्यात असल्याचा संभाव्य अंदाज लक्षात घेता, प्रत्यक्ष बाधित क्षेत्राच्या पाहणीसाठी गेल्या आठ दिवसां पासून कृषी विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रत्यक्ष बुलडाणा येथील कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत प्राप्त अर्जानुसार १५ हजार हेक्टरवरील कपाशीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. येत्या काळात हा आकडा सातत्याने वाढता राहणार असल्याचे संकेतही सूत्रांनी दिले. त्यामुळे उपविभागीय कृषी विभागाची पथके गावपातळीवर पाठविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकर्यांकडून विहित नमुन्यात कृषी केंद्राचे बिल आणि पेरणी केलेल्या कपाशीच्या पिशवीसह अर्ज मागविण्यात आले आहेत. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात नुकसानीच्या मदतीची घोषणा केली जाण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेता, संबंधित कृषी कार्यालयात शेतकर्यांची गर्दी दिसून येते. कापूस वेचणीला गेले असता ही मोठी अडचण येत आहे.
बोंडअळीमुळे उत्पादनावर परिणाम!कपाशीच्या पेरणीनंतर साधारणपणे ९0 दिवसांनंतर गुलाबी-सेंदरी बोंडअळीचा हल्ला होतो; मात्र यावर्षी ऑगस्टमध्येच या बोंडअळीने हल्ला केल्याचे आढळून आले. ही अळी सरकी खाणारी असल्याने, कापसाची प्रत खराब होते. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होतो.
कामाचा ताणबुलडाणा जिल्ह्यात जवळपास ३५0 कृषी सहायक कार्यरत आहेत. भौगोलिकदृष्ट्या जिल्हा मोठा असून, १३ तालुक्याचा आहे. त्यामुळे या कामासह अन्य कामे करण्यात कृषी सहायकांची दमछाक होत आहे. त्यामुळे या कामात ग्रामसेवक आणि तलाठी वर्गालाही समाविष्ट करण्याची गरज व्यक् त केली जात आहे.
गुलाबी- सेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे बाधित क्षेत्राच्या माहितीसाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. यासाठी गावपातळीवर भेटी दिल्या जात आहेत. त्याच प्रमाणे शेतकर्यांकडूनही अर्ज मागविण्यात आले आहेत. - एन.के. राऊतउपविभागीय कृषी अधिकारी, खामगाव.