सगळीकडे निराशेचे वातावरण असताना बुलडाण्यातील कोविड रुग्णांना मदत होईल, असे काहीतरी आपण करावे असा विचार एडेड हायस्कूलच्या माजी विद्यार्थी समूहात चर्चेला आला. विचाराअंति सगळीकडे जाणवणारा प्राणवायूचा तुटवडा बघता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याचा विचार पुढे आला. फक्त व्हॉट्सॲप समूहातील माजी एडेडियन्सनी एक पुरेसा निधी अवघ्या चार दिवसात संकलित केला. फक्त व्हॉट्सॲपवर केलेल्या एका छोट्याशा आवाहनाला प्रतिसाद देत एडेडच्या माजी विद्यार्थी समूहाने तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले व ते बुलडाणा परिसरातील गरजू रुग्णांना मदत होईल या हेतूने जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, बुलडाणा यांच्याकडे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देशपांडे व सदस्यांनी सुपूर्द केले. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह एडेड हायस्कूलचे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देशपांडे, उन्मेष जोशी, मनोज बुरड, आनंद संचेती, अशोक शर्मा, आशिष शर्मा, विनोद राठी, राजेंद्र महाजन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
एडेडच्या माजी विद्यार्थ्यांनी दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:32 AM