जळगाव(जामोद) : राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार हे संकल्प सभेच्या निमित्ताने २१ मे रोजी जळगाव जामोद येथे येत आहेत.जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजचा,कृषी महाविद्यालय असे महत्त्वाचे प्रश्न असून त्यांना मंजुरात मिळेल आणि जिल्ह्यातील रखडलेल्या प्रश्नांना निधी उपलब्ध होईल.तसेच जिगाव पुनर्वसन वासियांचा प्रश्न अर कचेरी वरील सिंचनाचा प्रश्न, आदिवासी विकासाचा प्रश्न असे बरेच प्रश्न प्रलंबित असून सर्व प्रश्न अजितदादांच्या माध्यमातून मार्गी लागतील आणि पक्षवाढीसाठी सुद्धा दादांच्या सभेचा उपयोग होईल,असा दुहेरी उद्देश आमचा आहे.म्हणून ह्या परिसरातील नागरिकांनी २१ मे रोजीच्या संकल्प सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केले.ते दिनांक १४ मे रोजी जळगाव जामोद येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेनिमित्त आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील, विधानसभा अध्यक्ष प्रकाशशेठ ढोकणे,बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी,जळगाव,संग्रामपूर व शेगाव तालुक्याचे तालुकाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार २१ मे रोजी जळगाव जामोद येथे येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 7:01 PM