अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव : राज्यात दुष्काळ जाहीर करा, शेतकरी, शेतमजुरांची कर्जमाफी करा या प्रमुख मागण्यांसह शेतकरी, शेतमजूर कामगार कर्मचारी महिला व विद्यार्थ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांसाठी अखिल भारतीय किसान सभा, आशावर्कर गटप्रवर्तक संघटना खामगाव, स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने मंगळवारी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी प्रवेशद्वारात निदर्शने करण्यात आली.
निवेदनात संयुक्त किसान मोर्चा व कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीने कामगार, कर्मचारी, विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नावर राज्यव्यापी महा मुक्काम व मोर्चा आयोजित केला होता. मात्र, या मोर्चाला राज्य शासनाने परवानगी नाकारल्याने संघटनेने तालुका आणि जिल्हा स्तरावर आंदोलन छेडल्याचे नमूद केले. या निवेदनावर दादा रायपुरे, जितेंद्र चोपडे, अनिल गायकवाड, रामचंद्र भारसाकळे, रामेश्वर काळे, शेख अकबर, विजय पोहनकार, विप्लव कवीश्वर, संध्या पाटील, संगीता काळणे, रोजा बाठे, महेश वाकतकर, रितेश चोपडे, आशुतोष ठोंबरे, शीतल चोपडे, गौतम नाईक, संजय झांबरे, सुनील चोपडे, कुणाल भारसाकळे, गजानन मानकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.