नांदुरा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील अलमपूर येथे १८ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे. २५ वर्षांंपासून होणार्या विरोधाच्या पृष्ठभूमीवर निघणार्या या मिरवणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान, गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा व नागार्जुन बुद्ध विहारात भारतरत्न बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी गावातून मिरवणुकीची परवानगी नसल्याने चार हजार लोकसंख्येचे अलमपूर हे गाव चर्चेत आले होते. पोलिसांनी यावर्षी १८ एप्रिल रोजी मिरवणुकीची परवानगी दिल्यानंतर गावात मागील दहा दिवसांपासून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीदिनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मैदानात मंडप टाकून जयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
अलमपूर गावाला पोलीस छावणीचे स्वरूप!
By admin | Published: April 15, 2016 2:11 AM