शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

मोताळा तालुक्यातील ‘त्या’ चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:55 AM

मोताळा: तालुक्यातील राजूर येथील अवैध गर्भपात प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी चार जणांना अटक करून पोलीस कोठडी मिळवली होती. दरम्यान, न्यायालयाने मंगळवारी त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली होती. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

ठळक मुद्दे बोराखेडी पोलिसांनी चार जणांना अटक करून पोलीस कोठडी मिळवली होतीगुरुवारी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा: तालुक्यातील राजूर येथील अवैध गर्भपात प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी चार जणांना अटक करून पोलीस कोठडी मिळवली होती. दरम्यान, न्यायालयाने मंगळवारी त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली होती. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.तालुक्यातील राजूर येथे बीड जिल्ह्यातील एका विवाहितेचा बेकायदेशीर गर्भपात करण्यात आला होता. त्यापूर्वी तिचे परराज्यात गर्भलिंग निदान करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून वैद्यकीय अर्हता नसलेल्या ब्रिजलाल सुपडा चव्हाण (५0 रा. गुळभेली, ता. मोताळा), डॉ. सैय्यद आबिद हुसेन सैय्यद नजीर (४९, रा. बुलडाणा), गर्भपात करणारी विवाहिता व तिचा पती किशोर सुदामराव चाळक (२९, रा. किनगाव ता. गेवराई, जि. बीड) या चार जणांना अटक केली होती. सुरुवातीला त्यांना २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली होती. गुरुवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास बोराखेडीचे पोलीस निरीक्षक अविनाश भामरे करीत आहेत.दरम्यान, या प्रकरणाचे धागेदोरे हे परराज्यातही पसरले असल्याचे स्पष्ट होत आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे. गेल्या एक महिन्याच्या कालावधीत बुलडाणा जिल्हय़ात गर्भपातासंदर्भातील तीन घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा गर्भपातासंदर्भात संवेदनशील बनला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Abortionगर्भपातbuldhanaबुलडाणा