बुलडाणा : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय यांच्याकडून पुरविण्यात येणाºया रोजगारविषयक सर्व सेवा आता आॅनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा आॅनलाईन मिळणार असून त्यासाठी संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक, आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालये कायदा २९५९ अन्वये त्रैमासिक ईआर-१ ची माहिती बंधनकारक असलेली माहिती या संकेतस्थळावर द्यावी लागणार आहे. सप्टेंबर २०१७ अखेर संपणाºया त्रैमासिककरीता माहिती या संकेतस्थळावर त्यांचे युजन आयडी व पासवर्ड लॉग ईन करून आॅनलाईन सादर करावयाची आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावयाचे आहे. आॅनलाईन ईआर-१ सादर करण्यात काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा या कार्यालयाशी संपर्क साधावा. ईआर-१ सादर करण्याची अंतिम मुदत ३१ आॅक्टोंबर २०१७ आहे. यामध्ये कसुरदार आस्थापनांवर विहीत नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, याची नोंद घेण्यात यावी, असे सहायक संचालक चिमणकर यांनी कळविले आहे.
रोजगारविषयक सर्व सेवा आता मिळणार आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 1:41 PM