वाशिम: नाफेडच्या वतीने १२ आॅगस्ट २०१७ पर्यंत हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या तूरीच्या प्रलंबित चुकाºयांचे धनादेश वाटप प्रक्रियेस प्रारंभ झाला असून ऐन दिवाळीच्या तोंडावर हाती पडत असलेल्या रकमेमुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०१७ पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीच्या चुकाºयांचे धनादेश लिहून तयार आहेत; तर त्यानंतर १२ आॅगस्ट २०१७ पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीच्या चुकाºयांचे धनादेश हातोहात लिहून दिले जात आहेत. संबंधित शेतकºयांनी धनादेश घेण्यासाठी जात असताना सोबत ‘७/१२, ८-अ’ ही कागदपत्रे घेवून जावे आवश्यक नाही. मात्र, आधारकार्ड गरजेचे आहे. याची नोंद घेऊन आपापले धनादेश घेऊन जावे, असे आवाहन जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या वतीने करण्यात आले आहे.