बीबी : ब्रेक द चेनअंतर्गत विविध निर्बंध सध्या लावण्यात आले आहेत. बार पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे, परवानाधारक बार संचालकांना पार्सल सुविधा सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी जिल्ह्यातील बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय आर्थिक संकटातून जात आहे. परिणामी हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी यांचा राहण्याचा, खाण्याचा व वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवाय आस्थापना बंद असल्याने वीजबिल व इतर मेन्टेन्स खर्च निघणेही कठीण झाले आहे. यातच ३१ मार्च २०२१ रोजी परवाना फी जमा करून घेण्यात आली आहे. पुन्हा बार आणि हाॅटेल बंद झाल्यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून, कर्जबाजारी होत आहेत. त्यामुळे पार्सल सुविधेची परवानगी देण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी रवी चव्हाण, आसिफ कलाल, गजानन महाजन, सतीश रणमळे, भास्कर खुळे, अनिल सावजी, विनोदसेठ जैस्वाल, सुरेंदसिंग ठाकुर, दीपक काळे, अनिलराव हंडे, राहुल झोरे आदी उपस्थित हाेते.