कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ग्रामपंचायतींना केंद्रीय वित्त आयोगातून विविध विकासकामे करण्यासाठी राज्य व केंद्र यांच्याकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. सद्य:स्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामपंचायतींना करावयाच्या उपाययोजनांसाठी निधी आवश्यक आहे. मागील आर्थिक वर्षी केंद्रीय वित्त आयोगामार्फत प्राप्त निधीतून कोरोना उपाययोजनांसाठी खर्च करण्याची परवानगी दिली होती. तशीच परवानगी आता मिळाल्यास ग्रामपंचायतींना कचरा उपसा व सफाई करणाऱ्या मजुरांना संरक्षणात्मक मास्क, चष्मा, हातमोजे, सॅनिटायझर, कचरा पेटी खरेदी करता येतील. गाव निर्जंतुकीकरण व कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करता येतील. त्यामुळे १५ व्या केंद्रीय वित्त आयोग प्राप्त निधीतून ग्रामपंचायतींना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी खर्च करण्यास तत्काळ परवानगी मिळण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी आ. संजय रायमुलकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पंधराव्या वित्त आयोगातून कोरोनासाठी खर्च करण्याची परवानगी द्या - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:35 AM