अतिपावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष पाहणीअंती मिळालेल्या माहितीनुसार, आ. श्वेता महाले यांनी नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. पावसाने अनेक शेतकऱ्यांचे पाइप व स्प्रिंक्लर सेट वाहून गेले. अनेक घरांत व गोठ्यांत पाणी शिरल्याने नासाडी झाली. विहिरी गाळाने भरल्या आहेत. यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असल्याने नुकसानभरपाई मिळणे, हा त्यांचा हक्काचा भाग असला तरी गतवर्षी पीक विमा संदर्भाने शेतकऱ्यांना अत्यंत वाईट अनुभव आला आहे. गत वर्षी शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असतानाही शेतीचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. परिणामी, या वर्षी नुकसानग्रस्त भागातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही. मात्र, त्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त सर्वच शेतकऱ्यांना मदतीची नितांत गरज लक्षात घेता सर्वच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी आ. श्वेता महाले यांनी प्रशासनाकडे केली आहे.
पीकविमा नसलेल्या शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:41 AM