ऑनलाइन लोकमत
शिरपूर, दि. ६ - गावात होत असलेल्या दारु विक्रीवर पोलिसांनी छापा टाकून अवैध दारु विक्रीचा व्यवसाय उध्दवस्त केला. दारु विक्री करणा-या कुटुंबाचे पूनर्वसन करण्याच्या हेतूने गोवर्धन बिटला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मागदर्शन बैठकीचे आयोजन केले. तीन तास चाललेल्या या बैठकीत उपस्थित मान्यवर, वक्त्यांनी दारुपासून होणारे उध्वस्त कुटुंबाबात सविस्तर माहिती दिल्याने दारु विक्रेत्यांमध्ये परिवर्तन होवून त्यांनी यापुढे दारु विक्री न करण्याचा संकल्प केला.
शिरपूर जैन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया गोवर्धन, नावली या गावातील अवैध दारू विक्रेत्या केंद्रांवर २ सप्टेंबर २०१६ रोजी शिरपूर पोलीसांनी छापा मारला होता. दारू विक्रेत्यांचा व्यवसाय बंद पडल्यानंतर त्या कुटूंबाचे पुनर्वसन करण्यासाठी सोमवारी गोवर्धन बीटला एक मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली . या बैठकीला स्वत: ठाणेदार हरीश गवळी, गिरीश तोगरवाड(ढरक), मुपडे(ढरक), खालिद शेख, प्रशांत देशमुख सर, शंकरराव वाघ, भाई रजनीकांत, श्रीधरराव बाजड, रुपेश बाजड, नायबराव देशमुख, राठोड यांनी मार्गदर्शन केले..
दारू विक्रेत्या महिला व पुरुष हे कंजर समाजाचे आहेत.. दारू विक्रीचा व्यवसाय बंद करण्यात येणाº्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.. सर्व महिला-पुरुषांना बोलते करून त्यांचे शंका निरसन केले. एकाच बैठकीत अवैध दारू विक्रेत्यांचे मनपरीवर्तन करण्यात सर्वांना यश आले. दारुविक्रेत्या जानकाबाई,लिलाबाई,संजू, शंकर आणि लोखंडे व इतरांनी यापुढे दारु विक्री न करण्याचे अभिवचन उपस्थितांना दिले.
कार्यक्रमाला रमेश मोरे(अरक) , जगन्नाथ रंजवे सुद्धा हजर होते. गोवर्धन व नावली गावचे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रा.पं.चे पदाधिकारी, जेष्ठ नागरिक आणि अनेक युवक उपस्थित होते.संचालन अनिल बळी यांनी तर आभारप्रदर्शन श्रीधरराव बाजड यांनी केले.
दारुविक्रेत्यांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा मान्यवरांनी उचलला खर्च
या मोबदल्यात या दारु विक्रेत्या कुटूंबातील इयत्ता १ली ते १२वीत शिकणा़ºया मुलांना शिक्षणासाठी केनवड येथील दीपक शेवाळे यांनी दत्तक घेतले. तर श्रीधरराव बाजड यांनी या कुटूंबातील मुलांच्या शालेय खर्चाची जबाबदारी घेतली. त्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला. तसेच कंजर समाजातील दारू विक्रीचा व्यवसाय करणाºया या कुटूंबांना प्रवाहात आणण्यासाठी लवकर ठाणेदार हरीश गवळी लवकरच बीटस्तरीय बचत गटांची व्यवसाय मार्गदर्शन कायर्शाळा आयोजित करणार आहेत.