लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : चिखली तालुक्यातील ग्रामीण भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या उंद्री येथील एकाचे घरासमोरील ट्रॅक्टर व ट्रॉली चोरून नेल्याच्या प्रकरणात अमडापूर पोलिसांनी तीन महिन्यांनंतर फरार आरोपीस अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.सुरेश रमेश उपासे असे अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, खामगाव येथून पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांकडून एमएच-२८-टी-६३८३ क्रमांकाचे ट्रॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेतली आहे. सुरेश उपासे यास न्यायालयाने २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अमडापूर येथील राजेंद्र दामोधर मानकर (४0) यांचे घरासमोर उभा असलेला ट्रॅक्टर १७ नोव्हेंबर २0१७ रोजी अज्ञात चोरट्याने लंपास केला होता. ट्रॅक्टर व ट्रॉली मिळून त्याची जवळपास पाच लाख रुपये किंमत होती. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी, ठाणेदार विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश भोसले, पोलीस कॉन्स्टेबल सतीश नागरे, दीपक चव्हाण यांनी केला. तपासात आरोपी हा उंद्री येथीलच असल्याचे समोर आले. सुरेश रमेश उपासे हा आरोपी असून, तो गावातून फरार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, तीन महिन्यांनंतर तो घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.
फरार ट्रॅक्टर चोर अमडापूर पोलिसांच्या जाळय़ात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:07 IST
अमडापूर : चिखली तालुक्यातील ग्रामीण भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या उंद्री येथील एकाचे घरासमोरील ट्रॅक्टर व ट्रॉली चोरून नेल्याच्या प्रकरणात अमडापूर पोलिसांनी तीन महिन्यांनंतर फरार आरोपीस अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
फरार ट्रॅक्टर चोर अमडापूर पोलिसांच्या जाळय़ात!
ठळक मुद्देआरोपीची पोलीस कोठडीत रवानगी