लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर (बुलडाणा): उत्रादा शिवारातील विहिरीत एका पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली. शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान ही घटना उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार, माजी पोलिस पाटील भगवान इंगळे त्यांच्या शेतात हरभरा काढण्यासाठी मजूर घेऊन गेले होते. दुपारी त्यांना विहिरीत महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला. याबाबत त्यांनी तत्काळ अमडापूर पोलिस स्टेशनला माहिती दिली. ठाणेदार विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ राजेश गवई, नीलेश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत महिलेची ओळख पटली असून हापीजा बी. शेख तस्लिम असे तिचे नाव असून ती पेठ येथील रहिवासी होती. मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमडापूर : विहिरीत आढळला पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 20:22 IST
अमडापूर (बुलडाणा): उत्रादा शिवारातील विहिरीत एका पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली. शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान ही घटना उघडकीस आली.
अमडापूर : विहिरीत आढळला पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह
ठळक मुद्देउत्तरादा शिवारातील घटना; आकस्मिक मृत्यूची नोंद मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही