शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

शाळेच्या जवळच बारुदचे गोडाऊन

By ram.deshpande | Published: July 25, 2017 7:27 PM

खामगाव : तालुक्यातील लांजूड येथे शाळेच्या जवळच बारुदचे गोडाऊन बांधण्यात आलेले आहे. हे गोडाऊन हटविण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेवूनही उपयोग न झाल्याने गावकºयांनी आता एसडीओंकडे धाव घेतली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या जीवितास धोका - मुख्याध्यापकगोडाऊन हटविण्यासाठी ग्रामपंचायतने घेतला होता ठरावगावकर्‍यांनी घेतली ‘एसडीओं’कडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यातील लांजूड येथे शाळेच्या जवळच बारुदचे गोडाऊन बांधण्यात आलेले आहे. हे गोडाऊन हटविण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेवूनही उपयोग न झाल्याने गावकºयांनी आता एसडीओंकडे धाव घेतली आहे. सदर गोडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका असल्याचे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुध्दा दिलेले आहे. त्यामुळे बारुदसारख्या विस्फोटकांचे हे गोडाऊन त्वरित हटविणे गरजेचे बनले आहे.याबाबत उपविभागीय अधिकारी यांना लांजूड येथील रहिवाशांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, येथील गट नं.१२४ मध्ये रतनलाल पंकजलाल तोष्णीवाल यांच्या मालकीचे गोडाऊन असून त्याची सात-बारामध्ये तलाठी यांनी नोंद केलेली नाही. याअगोदरच्या ग्रामपंचायतच्या कार्यकारिणीने सदर गोडाऊनकरिता ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. परंतु ग्रामस्थांना विश्वासात न घेता मासिक सभेतील ठरावाद्वारे सदर प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच ग्रामपंचायतने ना हरकत प्रमाणपत्र हे शांतीलाल शर्मा यांना दिले होेते. मात्र शर्मा यांनी ते परस्पर रतनलाल तोष्णीवाल यांना विकले. सदर गोडाऊनमध्ये बारुद या विस्फोटकाची साठवणूक मोठ्या प्रमाणात करण्यात येते. परंतु या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा, पाण्याची व्यवस्था, चौकीदार किंवा साधी वालकंपाऊंड सुध्दा नाही. सदर गोडाऊनपासून थोड्या अंतरावरच महाराष्ट्र विद्यालय नामक शाळा आहे. तसेच आजूबाजूला शेतकरी, शेतमजूर वर्ग काम करित असतो. त्यामुळे एखाद्यावेळी काही अपघात घडल्यास विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होवू शकतो. तसेच गोडाऊनजवळूनच जिगाव प्रकल्पाची मोठी पाईपलाईन गेलेली आहे. याअगोदर एकवेळा स्फोट झाला असता त्यामध्ये महिला व लहान मुलांसह काही जण होरपळले होते. परंतु गोडाऊनमालकाने त्यांना उपचारासाठी कोणतीही मदत केली नाही. तरी सदर गोडाऊन कायमस्वरुपी बंद करण्यात यावे अशी विनंती गावकºयांनी केली आहे. विशेष म्हणजे याअगोदर १ मे २०१७ रोजी लांजूड ग्रामपंचायतने सदर गोडाऊन बंद करण्याबाबत ग्रामसभेत ठराव घेवून त्याद्वारे संबंधितांकडे मागणी केली होती. परंतु काहीएक उपयोग झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा एसडीओ व तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. सदर निवेदनवजा तक्रारीवर रविंद्र थेरोकार, गजानन तायडे, गजानन कोटवार, ज्ञानराव थेरोकार, बाळकृष्ण आखरे आदींच्या सह्या आहेत.