- जयदेव वानखडे
जळगाव जामोद : स्थानिक ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता ७ हजाराऐवजी १ लाख रूपये विड्रॉल देण्यात आला तेव्हा सदर १ लाखाची रक्कम बँकेच्या कॅशीअरजवळ परत देवून जळगावमधीलच इंजिनिअर सुनिल भगत यांनी आपल्या प्रामाणिकपणाचा परिचय दिला. १८ जुलै रोजी सुनिल भगत हे सात हजार रूपये काढण्यासाठी बँकेत गेले. त्यांनी ७ हजाराचा विड्रॉल भरून दिला. पैसे घेण्यासाठी कॅश काऊंटरवर गेले तेव्हा कॅशीअर देशमुख यांनी त्यांना चक्क १ लाख रूपये कॅश दिली. तेव्हा क्षणभर ते चकीत झाले. परंतु दुसºयाच क्षणी त्यांनी ७ हजार रूपयांचा रक्कम परत केली. भगत यांचे प्रामाकिणपणामुळे त्यांना दिलासा मिळाला. यापुर्वी सुध्दा २००६ साली बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेमध्ये भगत यांना ५० हजार रूपये शिल्लक मिळाले होते. तेव्हा सुध्दा त्यांनी ते परत केले होते. त्यांच्या प्रामाणिकपणाचे बँक व्यवस्थापक तथा संचालकांनी कौतुक केले. त्याबद्दल कॅशीयअरकडून नजर चुकीने दिलेली १ लाखाची रक्कम परत केल्याबाबत भगत यांचे आभार व्यक्त करून त्यांच्या प्रामाणिकपणाची नोंद रजिष्टरमध्ये घेण्यात आली. सुनिल भगत हे पर्यावरणमित्र असून सर्पमित्र आहे. त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने तालुक्यातील कुठल्याही चांगल्या कार्यात त्यांचा सहभाग असतो. (प्रतिनिधी)