साखरखेर्डा : बहारदार सूत्रसंचालन अन् अमोघ वक्तृत्वाच्या ताकदीवरसंपूर्ण महाराष्ट्रात आपल्या श्रवणीय वाणीचा झेंडा फडकवणारे प्रख्यातमराठी कवी, नामवंत निवेदन अजीम नवाज राही यांच्या सूत्रसंचालनाची दखल संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आपल्या रिफ्रेशर कोर्समध्ये घेतली.२० जून ते १० जुलै २०१७ या कालावधीत सध्या अमरावती विद्यापीठात १९९० नंतरचे मराठी साहित्य आणि उपयोजन या विषयांतर्गत रिफ्रेशर कोर्स सुरु आहे. याकोर्समध्ये संपूर्ण राज्यातले तज्ज्ञ प्राध्यापक सहभागी झाले आहेत. रोजवेगवेगळ्या क्षेत्रातील मातब्बर मंडळीचे व्याख्यान विद्यापीठातर्फेआयोजित केले जातात. २४ जून रोजी महाराष्ट्र राज्याच्या सुत्रसंचालनाच्याक्षेत्रात आपल्या आगळ्यावेगळ्या श्रवणीय तद्वत प्रयोगशील सूत्रसंचालनाचाअमीट ठसा उमटविणारे प्रख्यात मराठी कवी, नामवंत निवेदक अजीम नवाज राहीयांना ह्यसूत्रसंचालन कसे करावेह्ण या विषयावर व्याख्यान देण्यासाठीविद्यापीठाने आमंत्रीत केले. दोन सत्रामध्ये अजीम नवाज राही यांनीसूत्रसंचालनाच्या क्षेत्रातील पंचवीसवर्षीय अनुभावाची शिदोरी उपस्थितराज्यभरातल्या प्राध्यापक श्रोत्यांसमोर उकलली. प्रास्ताविकपर मनोगताच्यामाध्यमातून प्रा.डॉ.मोना चिमोटे यांनी अजीम नवाज राही यांच्याहृदयस्पर्शी सूत्रसंचलनाचा धांडोळा घेतला. प्रा.डॉ.मोना चिमोटे म्हणाल्याबुलडाणा जिल्ह्यातल्या साखरखेर्डा सारख्या आडवळणी गावाला अजीम नवाज राहीयांच्या लेखणीने विशेषता वाणीने प्रसिद्धीचे, मानसन्मानाचे, प्रतिष्ठेचेवलय बहाल केले. साखरखेर्ड्यासारख्या वितभर गावात अजीम नवाज राही यांनीसूत्रसंचालन या कलेची केलेली साधना आता उभ्या महाराष्ट्रात श्रवणसौख्याचे मळे फुलवत आहे. प्रा. डॉ. मोना चिमोटे यांच्या प्रस्ताविकालाटाळ्यांच्या गजरात प्रतिसाद देऊन उपस्थित राज्यभरातल्या प्राध्यापकांनीअजीम नवाज राही यांच्या सूत्रसंचालनाला मानाचा मुजरा केला.
अमरावती विद्यापीठाने घेतली राहींच्या सूत्रसंचालनाची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2017 2:02 PM